शिवानीला बिग बॉसच्या घरातून हाकलले

    दिनांक :17-Jun-2019
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सुरुवातीपासूनच चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिवानी सुर्वे. बिग बॉसच्या घरातील तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे तर कधी वादामुळे शिवानी नेहमीच चर्चेत राहिली. मात्र नुकतीच तिची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खरंतर शिवानीने गेल्या आठवड्यात घरातून बाहेर पडण्यासाठी तमाशा केला होता. त्याच कारणामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढलं आहे.
 
 
बिग बॉसच्या घरात सतत होणारी भांडणं, त्यामुळे अनावर होणारा राग या सगळ्याचा परिणाम माझ्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होतोय. त्यामुळे मला घरातून बाहेर काढा अशी विनंती शिवानी वारंवार करत होती. इतकंच नव्हे तर बिग बॉसनं माझं ऐकलं नाही तर मी कायदेशीर कारवाई करेन अशी थेट धमकीच तिने बिग बॉसला दिली होती.
विक एंडच्या डावात सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी शिवानी सुर्वेकडून घरातून बाहेर पडण्याबाबत विचारले. शिवानीला घरात राहण्याची इच्छा नसताना तिला या घरात राहण्याचा आग्रह का केला यावर मांजरेकरांनी माधव देवचके आणि विद्याधर जोशींना खडसावले. अखेर महेश मांजरेकरांनी शिवानी सुर्वेला बिग बॉसच्या घरातून काढले. शिवानीच्या जागी आता हिना पांचाळ हिची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.