आमिर-बेबो पुन्हा एकत्र

    दिनांक :18-Jun-2019
आमिर खान आणि करिना कपूर यांची जोडी 'थ्री-इडियट्स'मध्ये झळकली होती. त्यानंतर खूप वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येतेय. आमिरचा आगामी सिनेमा 'लाल सिंग चढ्ढा'मध्ये करिना असल्याचं कळतंय. मिस्टर परफेक्शनिस्टनं 'लाल सिंग...'ची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. 
 
 
 
या सिनेमाच्या शूटिंगला अद्याप सुरुवात झालेली नाही. बेबो सध्या 'इंग्लिश मीडियम'च्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली आहे. ते संपवल्यावर लगेचच ती 'लाल सिंग...'च्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असं सांगितलं जातंय.