मणिरत्नम यांची प्रकृती सुखरूप

    दिनांक :18-Jun-2019
कार्डिअॅक अरेस्टच्या चर्चा खोट्या
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल केल्याचे वृत्त होते. त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र ते नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते व त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मणिरत्नम यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

 
 
‘नियमित आरोग्य तपासणीनंतर मणिरत्नम सर पुन्हा कामावर परतले आहेत. त्यांची तब्येत ठीक आहे,’ अशी माहिती त्यांचे माध्यम सल्लागार निखिल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
 
 
दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकार असलेले मणिरत्नम यांनी एकापेक्षा एक सरस हीट चित्रपट दिले आहे. बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवत त्यांनी गुरु, युवा यांसारखे दखल घेण्याजोग्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१४ मध्ये युवा चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.