ICCWorldCup2019 : रशिद खानच्या नावावर विश्वचषकात नकोसा विक्रम

    दिनांक :18-Jun-2019
मँचेस्टर,
इंग्लंड आणि अफगाणिस्तान या सामन्याच्या पहिल्याच डावात दोन विक्रम घडल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने या डावात 17 षटकार लगावत एक विक्रम आपल्या नावावर केला. त्याचवेळी दुसरीकडे अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानच्या नावावरही नकोसा विक्रम पाहायला मिळाला.

 
आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये 17 षटकार कोणत्याही एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले नव्हते. पण आज ही गोष्ट मॉर्गनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. यापूर्वी 16 षटकारांचा विक्रम विश्वचषकामध्ये ख्रिस गेलच्या नावावर होता. हा विक्रम मॉर्गनने मोडीत काढला आहे. रशिदने आयपीएलमध्ये भन्नाट गोलंदाजी केली होती. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना रशिदने भेदक मारा केला होता. पण विश्वचषकात मात्र त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.
 
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रशिदने 9 षटकांमध्ये तब्बल 110 धावा दिल्या. विश्वचषकात आतापर्यंत एवढ्या जास्त धावा कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या नाहीत. त्याचबरोबर फिरकीपटूने आतापर्यंत दिलेल्या या सर्वाधिक धावा असल्याचे म्हटले जात आहे.