‘या’ चित्रपटमध्ये शाहरूख, आर्यनचा आवाज

    दिनांक :18-Jun-2019
‘द लायन किंग’ या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीसाठी शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन आपला आवाज देणार आहे. सिनेमातला जंगलचा राजा 'मुफासा'साठी किंग खान आवाज देईल. तर, 'सिम्बा'च्या पात्राला आर्यनचा आवाज मिळणार आहे.
 
 
 
यासाठी सिनेमाच्या प्रोडक्शन हाऊससोबत करार करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या 'फादर्स डे'च्या निमित्तानं शाहरुखनं आर्यनबरोबरचा एक खास फोटो शेअरही केला होता. यात शाहरुख आणि आर्यनच्या टीशर्टवर 'मुफासा' आणि 'सिम्बा' यांच्या नावाचा उल्लेख होता.