नव्या नातीच्या आगमनाने खूश आजी हेमामालिनी

    दिनांक :19-Jun-2019
बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने १० जून रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला असून तिचं नाव मिराया तख्तानी ठेवल आहे. ही माहिती सोशल मीडियावर फोटोद्वारे समोर आली आहे.
नातीच्या आगमनामुळे हेमा मालिनी खूप आंनदी दिसत आहेत. हेमा मालिनी यांच्या मांडीवर मिराया आणि एका बाजूला ईशा देओलची मोठी मुलगी राध्या आहे. ईशाच्या डॉक्टरने हा फोटो इंस्टाग्राम अकाउंट शेअर केला आहे.

या आधी इशा देओल आणि तिचे पती भरत तख्तानी यांचे मिरायाला घरी घेऊन जातानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इशा देओलने २०१२ मध्ये उद्योगपती भरत तख्तानीशी विवाह केला आहे.