क्रिती लवकरच होणार पत्रकार!

    दिनांक :19-Jun-2019
हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सनॉन आजच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मॉडेलिंगपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करत असताना क्रितीने प्रत्यके पावलावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. ‘बरेली की बर्फी’, ‘स्त्री’,’दिलवाले’, ‘कलंक’ अशा चित्रपटांमध्ये झळकलेली क्रिती लवकरच ‘रईस’ चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

 
 
राहुल ढोलकिया यांचा आगामी चित्रपट थ्रिलर असून लवकरच त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये क्रिती महिला पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी क्रिती सध्या मेहनत घेत आहे.
या चित्रपटामध्ये मी साकारत असलेली भूमिका ही प्रचंड सशक्त आहे. त्यामुळे ही भूमिका पाहिल्यानंतर प्रेक्षक या भूमिकेला स्वतःच्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करतील, असं क्रितीने या भूमिकेविषयी सांगितलं. दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती सुनीर करत असून त्यांनी या चित्रपटाच्या तयारीसाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक खास वर्कशॉप ठेवलं आहे. हा चित्रपट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.