रशियात कारखान्यात स्फोट; 79 जखमी

    दिनांक :02-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम  
मॉस्को,
मध्य रशियाती एका फॅक्‍टरीमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटामध्ये सुमारे 79 जण जखमी झाले. मॉस्कोच्या पूर्वेकडे 400 किलोमीटर अंतरावर देरझिंस्क येथील क्रिस्ताल या फॅक्‍टरीमध्ये हा स्फोट झाला. जखमी झालेल्यांमध्ये ३८ कारखान्यातील कर्मचारी असून ४१ स्थानिक रहिवासी आहेत. १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र कोणीही ठार झाले नसल्याचे स्थानिक आपत्कालिन सेवेच्या प्रवक्‍त्याने सांगितले.
 
 
या स्फोटानंतर 100 मीटर परिसरामध्ये आगीचे लोळ उठले होते. स्फोटानंतर दोघेजण बेपत्ता असल्याचे वृत्त एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिले आहे. रशियातील तपास संस्थांनी या स्फोटामागील कारणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या फॅक्‍टरीमध्ये औद्योगिक मानकांचे उल्लंघन झाले होते का, याबाबत चौकशी केली जात आहे.