कमल हासन यांचा आता 'हिंदी' विरोध

    दिनांक :02-Jun-2019
डीएमकेकडून आंदोलनाचा इशारा

तभा ऑनलाईन टीम  
चेन्नई,
देशात अनेक ठिकाणी अभ्यासक्रम वेगवेगळे असतात. परंतु, सरकारने समितीची शिफारसी मंजूर केल्यानंतर संपूर्ण देशात आठवीपर्यंत हिंदी हा विषयही अनिवार्य होणार आहे. सध्या बिगर हिंदी राज्यांमध्ये म्हणजेच तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंदी अनिवार्य नाही. मात्र तामिळनाडूतील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यास केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा डीएमकेचे राज्यसभा खासदार तुरुचि सिवा यांनी दिला आहे. तसेच कमल हासन यांनीही हिंदी भाषेला विरोध केला आहे
 
 
तुरुचि सिवा यांनी हिंदी भाषा अनिवार्य केल्यास केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तुरुचि सिवा यांनी सांगितले की, ‘तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला, तर येथील जनता हे सहन करणार नाही. आम्ही येथील जनतेवर अन्याय केला, तर त्याला विरोध करण्यास तयार आहोत.’
 
दुसरीकडे, कमल हासन यांनीही हिंदी भाषेला विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘ मी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे मला असे वाटते की, हिंदी भाषा कोणावरही लादली जाऊ नये.’ यावरुन असे समजते की, तामिळनाडूत हिंदी भाषेचा द्वेष अद्यापही कमी झाला नसल्याचे दिसून येते. याआधीही तामिळनाडू हिंदी भाषेविरोधात आंदोलने झाली आहेत.
 
 
 
दरम्यान, देशात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची नाही आहे.