कतरिनाला मोदींसोबत जायचे आहे डिनरला

    दिनांक :02-Jun-2019
बॉलिवूड सेलिब्रिटींची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची किंवा त्यांच्यासोबत डिनर डेटवर जाण्याची अनेक चाहत्यांची इच्छा असते. काही चाहत्यांची ही इच्छा पूर्णदेखील होते. चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूड कलाकारांनादेखील एखाद्या व्यक्तीसोबत खास डिनर डेटवर जाण्याची इच्छा असते. अशीच इच्छा अभिनेत्री कतरिना कैफने नुकतीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कतरिनाला कोणत्याही अभिनेत्यासोबत डिनर डेटला जायचं नसून चक्क एका राजकीय नेत्यासोबत डिनर डेटला जायचं आहे.

 
 
सध्या सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या कतरिना आणि सलमानची चर्चा आहे. त्यातच कतरिनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या मुलाखतीमध्ये कतरिनाला कोणासोबत डिनर डेटला जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासोबतच तिला तीन पर्यायही सुचविण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मर्लिन मुनरो आणि कोंडोलीजा राइस या तीन जणांची नावं होती. या तिघांपैकी कतरिनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटवर जायला आवडेल असं सांगितलं.
दरम्यान, सध्या कतरिना आणि सलमान त्यांच्या भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट येत्या ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, तब्बू या कलाकारांची मांदियाळी आहे.