हिस्सा तर त्यांना आधीच दिला आहे - औवैसींना भाजपाचे उत्तर

    दिनांक :02-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
भारतामध्ये मुस्लिमांचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही देशात भाडेकरू नाहीत, असे वक्तव्य एमआयएमचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर निशाणा साधत केले होते. यावर भाजपा प्रवक्ते माधव भंडारी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटले आहे. 

 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना असुदुद्दीन ओवैसी म्हणाले की, भाजपाने लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या म्हणजे देशात मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. भारतीय राज्यघटनेचा हवाला देत मी पंतप्रधानांना इतकेच सांगू इच्छितो की, असुदुद्दीन ओवैसी हा हक्कासाठी तुमच्याशी लढत राहील.
 
 
संबंधित बातमी 
 
यावर भाजप प्रवक्ते माधव भंडारी प्रत्युत्तर देत म्हणाले,’ ओवैसींना कुणी भाडेकरु म्हटले नाही, पण हिस्सेदारीची भाषा करत असाल तर तुमचा हिस्सा १९४७ सालीच देऊन टाकला आहे, त्यामुळे हा विषय संपलाय.’ असदुद्दीन ओवैसींनी थोडे विचार करुन बोलावे, त्यांना कुणीही या देशात भाडेकरु म्हटलेले नाही, असेही ते म्हणाले.