नागपुरात पेटत्या चितेमध्ये उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

    दिनांक :02-Jun-2019
- एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारातील घटना  

 

तभा ऑनलाईन टीम  
नागपूर,
एका मनोरुग्ण तरुणाने पेटत्या चितेमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात  घडला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात हा प्रकार घडला आहे. शनिवारी संध्याकाऴी ६ वाजताच्या सुमारास महेश मारुती कोटांगले या 32 वर्षीय तरुणाने चितेमध्ये उडी घेतली. महेश हा जयताळा येथील आंबेडकर नगरामध्ये राहत होता. व मजुरीचे काम करत होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या मनावर परिणाम झाला होता.
 
एका मयत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेहाला अग्नी देऊन परतत होते. यावेळी परिसरातच खेळणारी मुले ओरडत बाहेर आली. महेशने चितेत उडी घेतल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. यावेळी लोकांनी स्मशानभुमीत धाव घेतली. मात्र तोवर महेश जळून खाक झाला होता.