अकोटमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू !

    दिनांक :02-Jun-2019
अकोट: अकोट वन्यजीव विभागातील धारगड वनपरिक्षेत्रातील गुर्गीपाटी वर्तुळातील गुर्गीपाटी नियतक्षेत्रातील वनखंड ९१४ मध्ये एक बिबट मृतावस्थेत आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. अद्याप बिबटच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.