हँग ग्लायडर...

    दिनांक :02-Jun-2019
कॅप्टन निलेश गायकवाड
9420286000
धाडसी खेळ, धाडसी कर्तब या मानवाला कायम आकर्षण असणार्‍या गोष्टी आहेत. त्यातच हवाई कर्तब, खेळ तर रोमांचाचा शिखरावर आहेत. ‘हँग ग्लायडर’ हा असाच एक रोमांचकारी खेळ आहे. या ‘हँग ग्लायिंडग’चा शोध सर्वात पहिले चीनमध्ये सहाव्या शतकात लागला होता. त्यावेळी त्यांनी जे पहिले ‘हँग ग्लायडर’ बनवले ते सर्व साधारण वजन असणार्‍या माणसाला पेलवू शकेल असे होते. 
 
 
हलकेअल्युमिनिअमचा पातळ कागद किंवा नायलॉन असणार्‍या पात्यानेबनलेले डेल्टा आकाराचे पंख असणारे ‘हँग ग्लायडर’ तास न तास एखाद्या पक्षाप्रमाणे हवेत तरंगण्यास मदत करतात. ‘हँग ग्लायडर’ उडविण्याकरिता चालकाला आपले ग्लायडर उंचावरून पकडत नेऊन उतारावर धावत न्यावे लागते. जेणेकरून हवापंखांना कापत लिफ्ट तयार होईल, ज्यामुळे GLIDER वर हवेत जाण्यास मदत होईल.
 
हवेत उडालेल्या हँग ग्लायडरला GLIDER जमिनीकडे ओढते व पुढे ढकलत जाते. आणि गरम हवेच्या झोक्यामुळे GLIDER पुन्हा वर जाण्यास मदत होते व असा उडण्याचा प्रवास सुरू होतो. हँग ग्लायडरला उडविण्याकरिता चालकाला त्रिकोणी आकारात बनलेल्या कंट्रोल बारला धरून उडावे लागते. हा बार घएएङ या नाकाला (टोकाला) जोडलेला असतो. हँग ग्लायडर उडवतांना चालक कंट्रोल बारला डावी किंवा उजवीकडे वळवून GLIDER ची दिशा बदलाविण्याकारिता वापरकरतो तसेच कंट्रोल बारला मागे किंवा पुढे करत गती वाढवणे किंवा कमी करणे ह्यासारखे कामे होत असतात, या कामांकरिता वायर जोडलेल्या असतात. सुरुवातीला हँग ग्लायडर हा थोडा असुरक्षित खेळ मानला जायचा, पण आधुनिक हँग ग्लायडरमुळे रिस्क थोडी कमी झाली आहे. हँग ग्लायडर उतरविताना चालकाला कंट्रोल बारला जितके शक्य आहे, तितके मागे ओढावे लागते, जेणेकरून नाक (टोक) जमीनीकडे वळेल. हँग ग्लायडर हे अतिशय सोप्या पद्धतीत बांधता येते, व घडी करत लरसमधून एका जागेवरून दुसरीकडे नेण्यास पण सोपे असते.
 
हँग ग्लायडर मूळतः Un-powered म्हणजे कुठलेही इंजीन नसणारे असते. आजकाल काही चालक आपल्या हँग ग्लायडरला छोटे इंजीन बसवितात. जेणेकरून ते सपाट जागेवरुनही उडू शकतील. व या प्रमाणे हवेत उडण्याचा मोह मानवाने करपस Hang Glider बनवून पूर्ण केला व याचेच रुपांतर छंद किंवा खेळात झाले.
(लेखक हवाई उड्डाण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
••