प्रिय विराट अन्‌...

    दिनांक :02-Jun-2019
प्रिय, विराट आणि त्याचे संघमित्र...
 
इंडियन प्रीमियर लीग मोसमात वेगवेगळ्या संघाकडून एकमेकांविरुद्ध खेळले. जिंकणारे  जिंकले, हरणारे हरले. आयपीएल संपल्यानंतर सर्व हेवे-दावे दूर सारून तुम्ही सर्व दोन-चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर ताजेतवाणे होऊन एकत्र आले आणि विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडकडे रवाना झाले. या आयपीएलदरम्यान लोकसभा निवडणुकाही झाल्या. तुम्ही गेले आणि इकडे लोकसभेचा निकाल लागला. गौतम गंभीरच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी 300च्यावर जागांसह मताधिक्क्याने निवडून आले. तमाम भारतीय नागरिकांनी पुन्हा एकदा मोदीर सरकारवर विश्वास दाखविला आणि त्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या सोपविल्या. पंतप्रधान इम्रान  खानपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपर्यंत जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मोदींनी जग जिंकले असा त्यांचा गवगवा होत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि आता पुन्हा तमाम भारतियांचे लक्ष कि‘केटकडे वेधले गेले आहे. 1983 आणि 2011 सालानंतर पुन्हा एकदा विश्वचषक भारतीय संघच जिंकेल , असे समस्त भारतीय कि‘केटप्रेमींना मनोमन वाटत आहे. तेव्हा विराट आणि त्यांच्या सर्व संघमित्रांनी एकच सांगणे आहे. तुम्ही तुमच्या लौकीकास साजेशी कामगिरी करा म्हणजे विश्वचषक आपलाच झाला म्हणून समजा.

 
 
विराट, तू तर कसोटी आणि वन-डे कि‘केटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. संधी मिळाली की मनसोक्त फलंदाजी करायची, ही तुझी लहानपणापासूनची सवय आहे. तसे आता विश्वचषकातही इतर संघमित्र कमी-अधिक प्रमाणात खेळतीलही, परंतु तुझी बॅट तळपलीच पाहिजे.
रोहित शर्मा आणि शिखर धवन. शिखर धांदरटपणा कमी कर. रोहितच्या सोबतीने चांगली सलामी करून भारताच्या डावाची दमदार सुरुवात कर. एमएस धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तुला नव्याने काही सांगण्याची गरज नाही. तुनेच एकदा कपिलदेवनंतर देशाला विश्वचषक जिंकून दिला. विराटला तुझ्या अनुभवाची गरज आहे. लोकेश राहुल तू इंग्लंडला गेल्याबरोबरच भारतीय व्यवस्थापनाचा चौथ्या क‘मांकाचा प्रश्न निकाली लावला. आता विश्वचषकात या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस.
हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा तुम्ही अष्टपैलू आहे. तुम्ही आपली अष्टपैलू कामगिरी करून देशाला विश्वचषक जिंकून देण्यात हातभार लावा. विशेषतः हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यसार‘या युवा व दमदार खेळाडूंकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. तुम्ही आपल्या बहारदार प्रदर्शनाने कि‘केटरसिकांची मने जिंकाच, पण सोबतीला भारतासाठी विश्वचषकसुद्धा. तुम्हाला चायनामन कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल यांची साथ राहीलच. यष्टीमागून म्हणा अथवा ड्रेिंसग रूममध्ये तुम्हाला धोनीकडून अनुभवाचे बोल मिळतीलच. शिवाय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही मार्गदर्शन आहेच. दिनेश कार्तिक, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार तुम्हालाही संधी मिळाले की, संधीचे सोने करून दाखवाच. एकीचे बळ असले की, जगातल्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्यावर मात करता येते. ते तुम्ही करा आणि भारतात विश्वचषक घेऊनच या. ही शुभेच्छा...
 
 मिलिंद महाजन
7276377318