विधानसभेसाठी मनसेने कसली कंबर !

    दिनांक :02-Jun-2019
पुणे : विधानसभेच्या निवडणुकीत आपले इंजिन पळवण्यासाठी मनसेने कंबर कसली असून राज ठाकरेंसह पक्षाचे इतर पदाधिकीरी निवडणुकीच्या कामालाही लागले आहेत. यासाठी पुणे शहर, जिल्हा आणि पश्‍चिम महाराष्ट्र येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि शाखा प्रमुखांची बैठक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलावली आहे. आज भोसले नगर येथील अशोक सोसायटीच्या हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सुरु होणाऱ्या बैठकीत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वांचे मोबाईल क्लब हाऊसच्या गेटवरच जमा करुन घेतले जात असल्याचं कळतंय. त्यामुळे मनसेच्या या बैठकीत गुप्त चर्चा होणार असल्याचं उघड आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकांवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी भाजप विरोधी प्रचार केला होता. ज्याचा निकालावर कुठलाही परिणाम झाला नाही.