RSA vs BAN.. हे खेळाडू ठरू शकतात 'गेम चेंजर'

    दिनांक :02-Jun-2019
इंग्लंडविरुद्ध साऊथ आफ्रिकेला पराभव पत्करावा लागल्यानंतर रविवारी बांगलादेशविरुद्ध लंडनच्या ओव्हल मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या विजयाचे ध्येय दक्षिण आफ्रिकेने बाळगले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडकडून १०४ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. काहीशा गोंधळात टाकणाऱ्या ओव्हलच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला ८ बाद ३११ धावांवर रोखले होते. मात्र जोफ्रा आर्चरच्या वेग आणि उसळीसमोर दक्षिण आफ्रिकेची २०७ धावांवर दाणादाण उडाली होती. आता पुन्हा याच मैदानावर होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

 
२००७च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघाला ‘सुपर-एट’ फेरीत ६७ धावांनी हरवले होते. त्या संघातील चार खेळाडू अद्यापही बांगलादेश संघातून खेळत असल्यामुळे जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या बांगलादेशला कमी लेखण्याची चूक दक्षिण आफ्रिकेसाठी महागात ठरू शकते.
शकिब अल हसन
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या शकिब अल हसनची कामगिरी बांगलादेशसाठी नेहमीच महत्त्वपूर्ण ठरली आहे. महत्त्वाच्या क्षणी तोच संघासाठी तारणहार ठरला आहे. शकिबचे फलंदाजीतील योगदान तसेच प्रभावी डावखुरी फिरकी ही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते.
मुशफिकूर रहीम
बांग्लादेश संघासाठी मुशफिकूर रहीमचे अनुभव लाभदायक ठरू शकते. मुशफिकूर रहीम बंगदेश संघासाठी खूप महत्वाचा खेळाडू आहे. फलंदाजीसह तो वेकेट-किपिंग सुद्धा करतो. त्याचा स्ट्राईक रेट कमी असलातरी संघाला गरज असेल तेव्हा तो उत्तम खेळी खेळतो. त्याच्या नावावर सहा एकदिवसीय शतक आहे.
लुंगी एन्गिडी
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही फलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांवरच दक्षिण आफ्रिकेची मदार राहणार आहे. लुंगी एन्गिडीने इंग्लंडविरुद्ध तीन बळी मिळवत छाप पाडली होती. त्याने इंग्लंड विरोधात ३ विकेट्स घेतले होते. तसेच बांगलादेश विरोधात लुंगी एन्गिडीकाढून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
कॅगिसो रबाडा
त्याचबरोबर कॅगिसो रबाडा यानेही दोन बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घातली होती. आता बांगलादेशच्या फलंदाजांना रोखायचे असेल तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना कामगिरीत सातत्य ठेवावे लागणार आहे. आयपीएलमध्ये कॅगिसो रबाडाने उत्तम गोलंदाजी करून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. त्यांना लेग-स्पिनर इम्रान ताहीरची चांगली साथ लाभत आहे.
क्विंटन डी’कॉक
इंग्लंड विरोधात क्विंटन डी’कॉकने अर्ध-शतक ठोकले होते. मागच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेची फलंदाजी निराशजनक होती. सलामीवीर क्विंटन डी’कॉकला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी ४५ धावांची आवश्यकता असून हाशिम अमलालाही हे शिखर गाठण्यासाठी अद्याप ७७ धावांची गरज आहे.