प्रभात'ची पुनम राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत विदर्भातून दुसरी

    दिनांक :20-Jun-2019
अकोला : प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्य शिष्यवृत्त्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून प्रभातची पुनम सावरकर व ईशा कोरडे यांनी सीबीएसई व आयसीएसई शाळांच्या राज्य गुणवत्ता यादीत अनुक्रमे पाचवे व नववे स्थान प्राप्त केले आहे तर विदर्भातून अनुक्रमे दुसरे व चवथे स्थान प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे राज्य शिष्यवृत्ती स्पर्धा इयत्ता पाचवी व आठवीच्या स्टेट बोर्ड व सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. यावर्षी ही परीक्षा गत फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवार दि. १९ जून रोजी घोषित झाला. विदर्भातून प्रभातच्या सर्वाधिक दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. या परीक्षेत प्रभातच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून पुनम सावरकर राज्यातून पाचवी तर विदर्भातून दुसरी आली आहे. तसेच ईशा कोरडे हीने राज्यात नववे तर विदर्भात चवथे स्थान प्राप्त केले आहे. 'प्रभात'च्या प्राचार्य कांचन पटोकार, उपप्राचार्य वृषाली वाघमारे, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख व्ही. अनुराधा तथा समस्त शिक्षकवृंदांनी पुनम व ईशाचे कौतुक केले आहे.