वॉर्नरकडून १६६ धावांची खेळी

    दिनांक :20-Jun-2019
डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ३८१ धावांचा डोंगर उभा केला. वॉर्नरने कर्णधार अरॉन फिंच, उस्मान ख्वाजा यांच्यासोबत महत्वाची भागीदारी रचली. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत वॉर्नरने १६६ धावांची खएळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.

 
 
यादरम्यान वॉर्नरने २०१९ विश्वचषक स्पर्धेतील वय्यक्तिक सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला आहे. आपला कर्णधार फिंचला मागे टाकत वॉर्नर आतापर्यंत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. या खेळीत वॉर्नरने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.