सैफ, तैमूरला सोडून करीना भारतात

    दिनांक :20-Jun-2019
अभिनेत्री करीना कपूर खान पती सैफ, मुलगा तैमुर आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत लंडनमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. पण अचानक करीनाला मायदेशी परतावे लागले. करीना अचानकपणे भारतात परतल्यामुळे अनेक चर्चा बी-टाउनमध्ये सुरू होत्या. मात्र, या चर्चांना लवकरच पूर्ण विराम मिळाला. एका रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी करीनाला मायदेशी परतावे लागले.
 
 
करीना कपूर लवकरच आता 'डान्स इंडिया डान्स' या रिएलिटी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या शोच्या एका भागाचे चित्रिकरण २० जून रोजी पूर्ण करायचे होते. संबंधित वाहिनीला, प्रोडक्शनला टीमला तारखा देताना करीनाकडून घोळ झाला होता. तिने आपल्या सुट्टी दरम्यानचा एक दिवस नकळतपणे शोच्या चित्रिकरणासाठी दिला होता. त्यामुळे करीनाला कुटुंबियांसोबत सुट्टी एन्जॉय करताना पुन्हा चित्रिकरणासाठी वेळ द्यावा लागला. चित्रिकरण संपल्यानंतर करीना पुन्हा लंडनला रवाना झाली.
'डान्स इंडिया डान्स' च्या नवीन सीजन पासून करीना टीव्हीवर पदार्पण करणार आहे. याशिवाय, करीना कपूरच्या आगामी तीन चित्रपटांचे चित्रिकरण सुरू आहे. करीना करण जोहरच्या आगामी 'तख्त' या चित्रपटासह 'अंग्रेजी मीडियम' मध्ये इरफान खान बरोबर दिसणार आहे. 'जवानी जानेमन' मध्ये सैफ अली खान बरोबर दिसणार आहे.