शिखर धवन लवकरच मैदानात परतेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी

    दिनांक :20-Jun-2019
 
 
 
भारताचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून माघारी परतला आहे. भारतीय संघातून बाहेर पडताना धवन भावुक झाला होता. प्रत्येक खेळाडूचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न असते, तसे ते धवनचेही होते. पण दुखापतीमुळे धवनला आता विश्वचषकात खेळण्याची संधी मिळेल की नाही, याबाबत सांगता येत नाही. धवन हा या गोष्टीमुळे निराश झाला असला तरी तो लवकरच मैदानात परतेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.