शपथ विधीला दांडी मारून खासदार नुसरत जहां टर्कीमध्ये अडकली विवाहबंधनात

    दिनांक :20-Jun-2019
टर्की: पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहां नुकत्याच लग्नबेडीत अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत टर्कीमध्ये बुधवारी विवाहबद्ध झाल्या. सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले .

 
 
 
खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला. नव्या सरकारचे  पहिले संसदीय सत्र १७ जूनला होते. यात नव्याने खासदार झालेल्यांनी शपथ घेतली. मात्र त्यावेळी नुसरत टर्कीमध्ये प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये व्यग्र होत्या. नुसरत व निखिल यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुसरत जहां बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.