मोहाडी तालुक्यातील चारही पोलिस स्टेशनला नवीन ठाणेदार

    दिनांक :21-Jun-2019
अवैध रेती व्यवसायीकांचे मोठे आव्हान
मोहाडी: जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भंडारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात कार्यरत ठाणेदारांच्या प्रशासकीय बदल्या केल्या असून मोहाडी तालुक्यातील चारही पोलिस ठाण्यात नवीन ठाणेदार देण्यात आले आहेत.
मोहाडी तालुक्‍यात मोहाडी, वरठी, आंधळगाव व करडी हे चार पोलिस ठाणे येतात. मोहाडी येथील ठाणेदार शिवाजी कदम यांची बदली भंडारा येथे झाली असून त्यांच्या जागेवर निलेश वाजे हे रुजू झाले आहेत. तर वरठी येथील ठाणेदार व्ही.एन. राऊत यांच्या जागेवर पी.एस. रामटेके, आंधळगाव येथील ठाणेदार सोनटक्के यांच्या जागेवर ए.एम. कतलाम, तर करडी येथील ठाणेदार विजय पोटे यांच्या निधनाने रिक्त ठिकाणी एन.एन. उइके यांच्याकडे कारभार देण्यात आला आहे.
 

 
 
मोहाडी तालुक्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये आलेले ठाणेदार नवीन असल्याने त्यांना येथील भौगोलिक परिस्थिती, संवेदनशील गावे, लोकांची मानसिकता ओळखून कामे करताना चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे. मोहाडी तालुका सर्वाधिक अवैध रेती चोरीच्या बाबतीत प्रसिध्द झालेला असल्याने या चारही ठाणेदारांना अवैध रेती व्यवसायीकांचे मोठे आव्हान ठरणार आहे. नवीन ठाणेदार ते कशाप्रकारे हाताळतात याकडे सर्वांच्या नजरा टिकून आहेत.