भारताच्या समर्थनाचं ते टि्वट पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीने केले डिलीट

    दिनांक :21-Jun-2019
पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीने भारत २०१९ वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवू शकतो या टि्वटचे समर्थन केले होते.  या ट्विटमुळे तो अडचणीत सापडू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्याने लगेच माघार घेतली. मागच्या रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी दारुण पराभव केला. त्यानंतर आजतकच्या पत्रकाराने विराट कोहलीच्या टीमचे अभिनंदन करणारे टि्वट करताना भारताला वर्ल्डकप विजेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
महिला पत्रकाराच्या टि्वटवर हसन अलीने ‘होगी आप की दुवा पुरी कॉन्ग्रॅज्युलेशन’ असे टि्वट केले होते. हसन अलीने नंतर हे टि्वट डिलीट केले. भारताविरुद्धच्या सामन्यातील खराब प्रदर्शनाबद्दल हसन अलीला चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने नऊ षटकात ८४ धावांच्या बदल्यात फक्त एक विकेट मिळवला.