वैराग्यासाठी 'या' संन्याशाने निवडलीय ही खास जागा

    दिनांक :21-Jun-2019
 
 
 
संन्याशाला साधनेसाठी एकांत हवा असतो. संन्याशी दाट जंगलात जाऊन सन्यस्त आयुष्य जगतात. युरोपातल्या जॉर्जिया देशात मॅक्झीम नावाच्या माणसानं सन्यास घेतला. संन्यास घेतलेल्या मॅक्झीम यांनी सन्यस्त आयुष्य जगण्यासाठी जी जागा निवडली ती जागाच खास आहे. त्यांच्या आश्रमामुळे त्यांची जगभर ओळख झालीय. जॉर्जिया या देशातल्या आकाशाला भिडलेल्या आणि मुख्य पर्वत रांगेपासून वेगळा झालेल्या सुळक्यावर हा वैरागी राहतोय. 'कात्सखी सुळका' म्हणून या सुळक्याला संबोधलं जातं. १३० फुटांचा हा सुळका कोणत्याही गिर्यारोहकाला गिर्यारोहणासाठी खुणावेल. गिर्यारोहण करणं तिथं काही क्षण थांबून उतरणं एवढ्यापर्यंत ठिक आहे. मॅक्झीम नावाच्या वैराग्याला मात्र हे ठिकाण एवढं आवडलं की त्यांनी या सुळक्यावरच तळ ठोकलाय. १९९३ पासून म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून मॅक्झिम आजोबा या सुळक्यावर एकटेच राहतात. या सुळक्यावर छान असं घर बांधलंय. हे घर दिसायला आकर्षक नसलं तरीही राजाच्या राजमहालाला लाजवणारी शान या घराला लाभलीय. घर सामान्य असलं तरी आकाशात या घराला कोणाचीच स्पर्धा नाही. या सुळक्यावर जाण्यासाठी काही शिड्या आहेत. या शिड्यांवरुन मॅक्झीम आजोबा कधीतरी खाली उतरतात.