कंगनाच्या 'मेंटल है क्या?' चित्रपटाचं नाव बदलणार

    दिनांक :21-Jun-2019
मुंबई,
कंगना रनौत आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मेंटल है क्या??' हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटावर 'इंडियन सायकॅट्रिक सोसायटी'ने आक्षेप घेतल्याने चित्रपटाचं नाव बदलण्याची शक्यता आहे.

 
 
'मेंटल है क्या?' हा चित्रपट २६ जुलैला सिनेसरिकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधीच, 'इंडियन सायकॅट्रिक सोसायटी' या मानसशास्त्रज्ञांच्या मंडळाने या चित्रपटाच्या पोस्टर आणि विषयाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळं चित्रपटाच्या टीझरचं प्रर्दशन दोनदा रद्द करावं लागलं. आता, सायकॅट्रिक सोसायटीने चित्रपटाच्या शीर्षकावरही आक्षेप घेतला आहे.
सोसायटीने घेतलेल्या आक्षेपांवर सेन्सॉर बोर्ड गांभीर्यानं विचार करत असून, चित्रपटाचा ट्रेलर प्रर्दशित करण्यापूर्वी नाव बदललं जाणार असल्याचं सुत्रांकडून समजतं. चित्रपटाचं नवीन शीर्षक 'सेटिंमेंटल है क्या?' असं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.