उद्याच्या सामन्यात विजय शंकर 'इन' होणार ?

    दिनांक :21-Jun-2019
पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून विजय शंकर आता बरा होत असून तो उद्या अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
 
विजय शंकरलची आज फिटनेस टेस्ट घेण्यात आली. त्यात त्याला थोडं धावायला तसेच गोलंदाजी करण्यास सांगण्यात आलं. फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि ट्रेनर शंकर बसू यांच्या देखरेखीखाली ही टेस्ट झाली. या टेस्टनंतर विजयच्या फिटनेसबाबतचं त्यांचं मत मात्र समजू शकलं नाही. त्याचवेळी पत्रकार परिषदेत बोलताना विजयने मात्र आपल्या फिटनेसबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला. मला विचाराल तर मी आता पूर्णपणे फिट आहे, असे विजय म्हणाला. तू उद्या खेळू शकणार का, असे विचारले असता तशी आशा मला वाटते, असे सूचक वक्तव्य त्याने केले आहे.