१९९७ सालापासून हा अभिनेता करतोय लक्ष्मीकांत बेर्डेंना कॉपी

    दिनांक :22-Jun-2019
 

 
 
रसिकांना त्याने खळखळून हसवले ,रसिकांना सारे दु:ख विसरायला लावले आणि मनमुराद मनोरंजन केले. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा,त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरश: वेड लावले. केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे .लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. या अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आदर्श मानतात. पण, त्यांचा स्वतःचा मुलगा अभिनयदेखील त्यांना आदर्श मानत असून तो १९९७ सालापासून त्यांना फॉलो करत असल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं आहे.