जेव्हा गार्डने एअरपोर्टवर दीपिकाकडे मागितले आयकार्ड

    दिनांक :22-Jun-2019
अभिनेत्री दीपिका पदुकोणनं काही दिवसांपूर्वीच तिचा आगामी सिनेमा 'छपाक'चं शूट पूर्ण केलं असून त्यानंतर ती ‘83’च्या शूटिंगसाठी लंडनाला रवाना झाली होती. पण आता ती लंडनहून भारतात परतली असून नुकतीच तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिच्यासोबत तिचे वडील प्रकाश पदुकोणही होते. दीपिका यावेळी ऑल ब्लॅक लुकमध्ये दिसली. एअरपोर्ट एंट्री करताना तिथल्या गार्डनं दीपिकाला थांबवत तिच्याकडे आयकार्ड मागितलं. मात्र यावर दीपिकाची प्रतिक्रिया सर्वांना चकित करणारी होती.
 
 
 
दीपिका एअरपोर्टच्या आत एंट्री करत असताना मागून गार्डनं तिला आयडीसाठी आवाज त्यावर दीपिका मागे वळली आणि त्याला विचारल, आयकार्ड हवं का? त्यानंतर ती मागे वळली आणि तिनं शांतपणे आपलं आयकाकार्ड दाखवलं आणि पुढे गेली. पण दीपिकाच्या या कृतीनं सर्वांची मनं जिंकली. तिच्या या वागण्यावरून तिला तिच्या स्टारडमचा अजिबात गर्व नसल्याचं दिसून आलं. तसं पाहायला गेलं तर दीपिका सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असली तरीही तिचे पाय अद्याप जमिनीवर आहेत. ती नेहीच सर्वांशी नम्रपणे वागताना दिसते. यावेळीही तिनं आपलं स्टारडमचा गर्व न करता शांतपणे आयकार्ड दाखवून पुढे गेली. दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.