भुकेला चकोर...

    दिनांक :22-Jun-2019
भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयीचे प्रेम. त्याकरिता मनाचे संयमन व त्याकरिता योग व भक्ती हा दुग्धशर्करेचा योग घडायला हवा.
 
 
 
आहारविहार, इंद्रियनिरोध, नियमित राहणे, ईश्वराच्या प्रेमाची साधने कोणती? नामस्मरण, कथा-कीर्तन, साधू-समागम व सद्गुरुकृपा. भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात, ती वाईट कर्मे. जो नामात प्रपंच करील त्याचा अभिमान नष्ट होतो, सुखसमाधान मिळते. अनावर मनाला नामाचे ओंडके बांधावे म्हणजे सुखसमाधानाचा लाभ होतो.
‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर...’
भक्तीचे नऊ प्रकार- नवविधा भक्ती. भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होत असलेला पाझर, परमात्म्याचे गुणसंकीर्तन हीच भक्ती. भगवद्गीता अ. 8-15 मध्ये भगवान आपल्याला सांगतात की, हे जग दु:खाल्यम्‌, शाश्वतम्‌ आहे. इथे आज गोष्टी आहे उद्या नाही. इथे काहीच शाश्वत नाही. बनलेली गोष्ट मोडणारच आहे व जन्म घेतलेली गोष्ट इथे मरणारच आहे, त्यामुळे या ना त्या कारणाने समस्या राहणारच. जगात भगवंताशी संबंधित सोडल्या तर बाकी सर्व वाईट, अशाश्वत. आज चांगल्या गोष्टींचे पुढे वाईट स्वरूप येणारच.
पर्यावरणाच्या नाशाने कधी पाऊस जास्त पडेल, तर कधी दुष्काळ पडेल, या जगातील ऐहिक गोष्टींकडे असलेला ओढा कमी होणे जरुरी आहे आणि त्या विरक्तीसाठी भगवंताकडे म्हणजे भगवंतनामाकडे असणे जरुरी आहे. भगवान भगवद्गीता अ. 9.33 मध्ये सांगतात की, ‘‘अनित्यम्‌ असंख्य लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌.’’ म्हणजे या अनित्य आणि असुख्य (दु:खी) जगातून माझ्या भक्तीने सुटका होते, असे नामदेव सांगतात.
आता वंदू साधू सज्जना। रात्रंदिवस हरीचे ध्यान।।
रात्रंदिवस हरीचे ध्यान आणि त्याचे नाम जयाच्या तोंडी असेल, त्याची या मायाजालातून सुटका होईल.
चंद्राचे चांदणे पिण्याकरिता चकोर पक्षी भुकेला असतो. पांडुरंग ईश्वराने चंद्र व्हावे, मन करा थोर, अशी विनवणी भक्ताने केली पाहिजे. देव हा भावाचा भुकेला असतो.
नाहीतर, ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला!’ पाव असे होईल.
 
डॉ. कल्पना पांडे
9822952177