प्रशांत समर्थ यांची भूदान मंडळाचे शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

    दिनांक :22-Jun-2019
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्याच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आलेल्या महसूल व वनविभाग भूदान महामंडळ योजनेच्या सदस्यपदी मूल येथील भाजपााचे युवा कार्यकर्ते तथा नगर परिषदेचे सदस्य प्रशांत समर्थ यांची शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३० मे रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग ब अन्वये कळविण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीतील सकिय आणि होतकरू कार्येकर्ते प्रशांत समर्थ यांची शिफारस तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. भुदान मंडळातील कामकाजाला नक्कीच न्याय देऊ, असा विश्वासही प्रशांत समर्थ यांनी व्यक्त केला आहे.