‘कबीर सिंग’ने दुसऱ्या दिवशी कमविला इतक्या कोटींचा गल्ला

    दिनांक :23-Jun-2019
तामिळ चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला ‘कबीर सिंह’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली असून शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचं दिसून येत आहे.
व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर कबीर सिंगच्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळेच या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये एकूणचं ४२.९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.