‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’च्या सेटवर मृणालचा वाढदिवस साजरा

    दिनांक :23-Jun-2019
कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका सध्या लोकप्रिय आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी पासूनच प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि शशांक यांनी स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून मृणालने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. आता या मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन झाले आणि कारण होते मृणाल दुसानीसचा बर्थडे.
 
 
मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन मृणाल दुसानीसचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. सेटवर मृणालने केक कट केला. तसेच शशांकने मृणाला गिफ्ट ही दिले. दरम्यान सेटवर बरीच धम्माल मस्ती केली असल्याचे पाहायला मिळत आहे. मृणालचे बर्थडे साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. सिद्धार्थने अनुच्या प्रेमाखातर आता घर सोडले आहे. सिध्दार्थच्या प्रेमाची परीक्षा सुरु झाली आहे. सिध्दार्थला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे आणि मग अनु जवळ त्याचे प्रेम व्यक्त करायचे आहे. या सगळ्या घटनांमध्ये अनु सिडची खंबीरपणे साथ देत आहे. अनु सिद्धार्थला तिच्या घरी घेऊन जाते आणि त्याला आधार देते. आता सिध्दार्थला जॉब लागला असून यानिमित्ताने अनुच्या घरी सगळे सदस्य सेलिब्रेशन करतात. सिडला गिफ्ट देखील देतात. अनु सिद्धार्थला त्याच नवीन घर देते. सिध्दार्थ घर सोडून गेला याचे कुठेतरी दुर्गाला दु:ख होत आहे.