‘संदीप’ ठरला शैक्षणिक क्षेत्रातील जागतिक ब्रॅण्ड

    दिनांक :23-Jun-2019
नाशिक: जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधनात सक्रीय सहभाग व विविध उपक्रमाद्वारे जोपासलेली सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीमुळे संदीप फाऊंडेशन संचालित उत्तर महाराष्ट्रातील पहिले स्वयंअर्थसहायित संदीप विद्यापीठ तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न असणारी फाऊंडेशनची सर्व महाविद्यालये अग्रेसर ठरली असून, अवघ्या 11 वर्षांच्या कालावधीत ‘संदीप’ जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रातील मोठा ब्रॅण्ड ठरला असल्याचे प्रतिपादन संदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी केले.
 

 
 
सद्यस्थितीत संदीप फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील नाशिक व बिहारच्या सिजौल येथील शैक्षणिक संकुलात 15 हजारावर विद्यार्थी अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, एमबीए, ज्युनिअर कॉलेज विज्ञान व वाणिज्य, बी.एड. व शाळा अशा विविध क्षेत्रात शिक्षण घेत आहेत आणि हे सर्व अभ्यासक्रम तत्सम संस्थांसोबत संलग्न व मान्यताप्राप्त आहेत, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यास केवळ पदवी न मिळता, त्याला ज्ञान मिळावे हे आमचे ध्येय असून येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला विद्यार्थी चांगला कर्मचारी किंवा चांगला उद्योजक सिद्ध व्हावा, याकरिता अनेक उपक्रम राबविले जातात. युजीसीद्वारा संदीप विद्यापीठाला मान्यता मिळाली असून, अशी मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच खाजगी विद्यापीठ आहे, असे ते म्हणाले.
 
विविध संस्थांसोबत करार
माहिती, ज्ञान व संधीची आदानप्रदान होण्यासाठी संदीपने अनेक संस्थांसोबत करार केले असून, यात भाभा अणुसंधान संशोधन केंद्र, इस्रो, एचएएल, केंद्र शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पारंपरिक ऊर्जा मंत्रालय तसेच टोयोटा, आयबीएम, नॅसकॉम फाऊंडेशन, सीआयआय या काही प्रमुख संस्था आहेत.