हृतिक रोशनची बहीण सुनैना 'या' काश्मिरी पत्रकाराला करतेय डेट

    दिनांक :23-Jun-2019
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना मागच्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुस्लिम मुलाला डेट करत आसल्यानं माझे वडील आणि भाऊ यांनी मारहाण केल्याचा खुलासा सुनैनानं काही दिसांपूर्वी केला होता. सुनैनाच्या मते ती एका मुस्लिम मुलाला डेट करत असल्यानं तिचं आयुष्य नरकाप्रमाणे झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार सुनैना रुहैल अमीन नावाच्या एका जर्नलिस्टला डेट करत आहे. रुहैल एक काश्मीरी पत्रकार आहे आणि तो विवाहित आहे. तो नॉर्थ काश्मीर मधील आहे आणि सध्या दिल्लीतील एका न्यूज ऑर्गनायझेशनसाठी काम करत आहे.

 
 
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सुनैना म्हणाली, मी माझा बॉयफ्रेंड रुहैलला मागच्या वर्षीच भेटले होते. मी एका मुस्लीम मुलावर प्रेम करत होते यासाठी माझ्या वडीलांनी माझ्या कानाखाली मारलं आणि म्हटलं तो आतंकदवादी आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, त्यांनी रुहैलला स्वीकारावं. आम्ही अजूनही लग्नाचा विचार केलेला नाही. पण सध्या तरी मला त्याच्या सोबत राहायचं आहे.