ICCWorldCup2019 ; कर्णधार विराट कोहलीला दंड; अती आक्रमकपणा नडला

    दिनांक :23-Jun-2019
साऊदॅम्पटन,
भारतीय संघाने शनिवारी अफगाणिस्तानवर विजय मिळवत गुणतालिकेत आगेकूच केली. या विजयापेक्षा अफगाणिस्तान संघाच्या लढाऊ वृत्तीचेच अधिक कौतुक झाले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर नियमभंगाची कारवाई झाली आहे. 

 
 
आयसीसी कलमाच्या पहिल्या स्तरावरील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकणी कोहलीला दंड भरण्यास सांगण्यात आला आहे. त्याला त्याच्या मॅच फीमधील 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
विराटने आयसीसीच्या 2.1 कलमाचे उल्लंघन केले आहे. या सामन्यात त्यानं पचांकडे वारंवार अपील केली आणि त्यामुळे त्याला हा दंड भरावा लागणार आहे. अफगाणिस्तानच्या डावातील 29व्या षटकात हा प्रकार घडला. पायचीतची अपील करताना विराट पंच अलीम दार यांच्याकडे आक्रमकपणे धावला. कोहलीने ही चूक मान्य केली आहे.