राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार

    दिनांक :24-Jun-2019
मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेक नेत्यांनी समाजमाध्यमांवरून शुभेच्छा देणार्‍या पोस्ट शेयर केल्या होत्या. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीसुद्धा योग दिनानिमित्त ‘न्यू इंडिया’ अशा ओळीसह लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्विट करून योग दिनाची खिल्ली उडवत लष्कराचा अपमान केला होता. याच ट्विटमुळे राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात वकील अटलबिहारी दुबे यांनी तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधींनी भारतीय सैनिकांची प्रतिमा मलीन केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
 
राहुल यांच्या ह्याच ट्विटमुळे भाजपाने त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. डॉग युनिट ही भारतीय सैन्याचा एक भाग आहे. देशाच्या योगदानात त्यांची मोठी भागीदारी आहे. सैनिकांचा अपमान करणार्‍याला देवाने सद्बुद्धी द्यावी, असा टोला रक्षामंत्री राजनाथिंसह यांनी राहुल यांना लगावला होता.