कतार देणार पाकिस्तानला 300 कोटी डॉलर्सचे कर्ज

    दिनांक :24-Jun-2019
इस्लामाबाद,
अमीर शेख तमीम बिन हामेद यांनी केलेल्या पाकिस्तान दौर्‍यानंतर कतारने दुसर्‍याच दिवशी आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला 300 कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. व्यापारात सहकार्य, बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि दहशतवादासाठी दिला जाणारा निधी रोखण्याच्या अटींवर कतारने हे कर्ज दिले आहे.
 
 
 
पाकिस्तानला कर्जांचे हप्ते फेडणेही कठीण झाले आहे. पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानला या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना, मागील 11 महिन्यांत आखातामधील चौथा देश पाकिस्तानच्या मदतीसाठी समोर आला आहे.
 
यापूर्वी चीनने पाकिस्तानला 400.60 कोटी डॉलर्सचे ठेवीच्या रूपात आणि व्यावसायिक, सौदी अरबने ठेवीच्या रूपात 300 डॉलर्सचे आणि तेलाच्या स्थगित देयकांवर 300.20 कोटी डॉलर्सची सुविधा दिली आहे. संयुक्त अरब अमिरातनेही 200 कोटी डॉलर्सचे ठेवींच्या स्वरूपातील कर्ज पाकिस्तानला दिले आहे.