मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

    दिनांक :24-Jun-2019
मुंबई,
मुंबई महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनासमोर आज एका ३० वर्षीय तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 
सुदाम शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा घाटकोपर विभागाचा युवा अध्यक्ष आहे. घाटकोपर येथील एक शौचालय बिल्डरने दुसऱ्या भागात हलवले आहे. त्या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही कुणी दखल घेतली नाही. यामुळे संतापलेल्या शिंदे याने आपल्या तक्रारीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.