टिप्परच्या धडकेत महिलेचा करूण अंत

    दिनांक :25-Jun-2019
मंगरूळनाथ,
मंगरुळनाथ ते मानोरा रस्त्यवर जोगलदरि गावाजवळ, सिंगडोह फाटा परिसरात आज मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता दरम्यान टिप्पर आणि स्कूटीच्या धडकेत झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून अन्य दोन जण जखमी झाले आहे. 
 
 
 
विमलाबाई राठोड असे मृत महिलेचे नाव असून, या अपघात मृत महिलेचा पती आणि मूलगा जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात ऊपचार करण्यात येत आहे. मृत महिला आपल्या पती आणी मूलासोबत ग्राम सावरगांव येथे भावाला भेटून खापरदरी येथे गावी परत जात असताना सिंगडोह फाटा परिसरात मानोरा वरून येणाऱ्या ट्टिप्पर ने दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरु केला आहे. अपघातानंतर या रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.