अचलपुर-परतवाड्यात बियाण्याचा काळाबाजार

    दिनांक :26-Jun-2019
अचलपुर,
गेली तीन चार दिवस कोसळत असलेल्या पावसाने शेतकर्‍यानां शेतीच्या कामाला लावले आहे. बि व बियाण्यांची जुळवा जुळव करत असताना जुळ्या शहरातील काही कृषीकेंद्र चालक कपाशीच्या व तुरीच्या विशिष्ट वानची छापील किंमती पेक्षा जास्त दराणे विक्री करत आहे. शेतकर्‍यांच्या पंसतीस उतरलेल्या वाणाचा स्टॉक कमी आहे, असे दर्शवत जास्त दराने विक्री करीत आहे. 

 
 
एकीकडे पावसाने हुलकावण्या देत शेतकर्‍यांच्या नाकी दम आणला आहे. आता कसातरी पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. अचलपुर - परतवाडा शहरात गेल्या दोन दिवसापासुन बियाणे खेरदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड उडाली आहे. अचलपुर शहरातील देवडी भागातील काही कृषीकेंद्र तसेच गुजरी बाजार परतवाडा या ठिकाणावरील काही कृषी केंद्र चालक तुरीच्या व कपाशीच्या विशिष्ट वाणाची छापील किंमती पेक्षा ज्यास्त दराणे विक्री करत असल्याने शेतकर्‍यात रोष निर्माण झाला आहे. गरज असल्याने जास्त पैसे देवून शेतकरी ते नाइलाजास्तव ते खरेदी करत आहे.
 
अचलपुर शहरातील देवडी भाग तालुक्यातील निजामपुर, बोपापुर, चमक, सावळी, येवता, रासेगाव, तोंडगाव, राजना आदी गावाशी व्यापारी दृष्टीने जोडला गेला आहे. गुजरी बाजार ,परतवाडा हा भाग तालुक्यातील तसेच मध्यप्रदेशच्या अनेक गावाशी व्यापारी दृष्ट्या जोळले आहे. त्यामुळे ग्राहकांची पसंती वा गर्दी या भागातील कृषीकेंद्राकडे असते. त्याचा गैरफायदा काही कृषी केंद्र चालक घेत असल्याचे आढळून आले आहे. काही बियाने कंपण्यांचे वाण हे छापील किंमती पेक्षा कमी दराणे विक्री होत आहे तर काही छापील पेक्षा जास्त दराणे विक्री होत आहे. अशा कृषी केंद्रावर कार्यवाही करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
 
रास्त भावात विक्रीसाठी मंत्र्यांचे निर्देश
जिल्ह्यात कपाशी बियाणाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. खरीप नियोजनानुसार बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवावा व रास्त भावात बियाणाची विक्री केली जाईल, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले आहे. कृषी मंत्र्यांच्या आदेशानुसार कृषी संचालकांनी जिल्हा कृषी प्रशासन व कंपन्यांना बियाणाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत. जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात नियोजनाप्रमाणे व रास्त भावात कापूस बियाणाची विक्री केली जाईल याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.