नवाजुद्दीन आणि अनुराग पदड्यावर एकत्र झळकणार

    दिनांक :26-Jun-2019
मुंबई:
दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची ऑफस्क्रिन जोडी सुपरहिट आहे. परंतु, ही जोडी तब्बल २० वर्षांनी ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहे.
 

 
 
दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी १९९९ साली 'शुल' या सिनेमात एकत्र काम केले होते. त्या सिनेमात नवाजुद्दीनने अभिनय केला होता, तर अनुरागने सिनेमाचे संवाद लिहिले होते. त्यानंतर दोघांनी 'ब्लॅक फ्रायडे', 'गॅंग्स ऑफ वासेपूर', 'गॅंग्स ऑफ वासेपूर २' अशा अनेक चित्रपटात अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. परंतु, आता हे दोघेही पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नवाजुद्दीनचा आगामी सिनेमा 'बोले चूडिया'मध्ये नवाजबरोबर अनुराग कश्यपही दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शम्स सिद्दीकी करणार आहे.
अनुराग कश्यपला याबाबात विचारलं असता त्यानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. ' हो, मी या सिनेमात काम करत आहे. माझी भूमिका फार मोठी नाही. नवाजने मला या भूमिकेविषयी विचारले आणि त्याचा शब्द मी मोडू शकलो नाही. मी सध्या इतकंच तुम्हाला सांगू शकेन' असं तो म्हणाला.