वृक्षांचं स्थलांतर

    दिनांक :26-Jun-2019
आता वृक्ष लागवडीचं महत्त्व सार्‍यांनाच पटलं आहे. त्यामुळे दरवर्षी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम पार पडतात. ते पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे असतात. परंतु शाळा-कॉलेज आणि स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपणासोबत वृक्ष स्थलांतराच्या कार्यक्रमावर भर देणंही गरजेचं आहे. कारण देशात रस्ते रूंदीकरण तसंच विविध विकास प्रकल्पांची कामं वेगानं सुरू आहेत. त्यात अडसर ठरणारी परंतु अनेेक वर्षांपासून सावली देणारी झाडे तोडावी लागतात. हे नष्ट होणारे वृक्ष आपण स्थलांतराद्वारे वाचवू शकतो. त्यादृष्टीने वृक्ष स्थलांतराविषयी माहिती असायला हवी. 

 
 
1) झाड खूप मोठं असल्यास त्याचं खोड जमिनीपासून पाच ते दहा फूटावर करवतीनं कापावं. तर झाड कमी उंचीचं असल्यास कापलं नाही तरी चालेल.
 
2) झाडाच्या आजुबाजुला पाच ते सात फूट व्यासाचा आणि दोन ते तीन फूट खोलीचा खड्डा खोदावा. झाडाच्या विस्तारानुसार हे अंतर कमी-जास्त प्रमाणात ठरवावंं. खड्‌ड्याच्या परिघातील झाडाची उघडी पडलेली मुळं करवतीनं िंकवा कुर्‍हाडीनं कापून टाकावी. त्यानंतर झाड जमिनीपासून उपसून बाहेर काढावं. यासाठी जेसीबीची मदत घ्यावी.
 
3) हे उपसलेलं झाड इच्छित स्थळी अगोदरच करून ठेवलेल्या पाच ते सात फूट खोलीच्या खड्‌ड्यात आणून ठेवावं. या स्थलांतरित केलेल्या झाडाला मुळ्या लवकर फुटण्यासाठी त्यात पालापाचोळा, गांडूळखत, शेणखत, पोयट्याची माती यांचे मिश्रण टाकावं.
 
4) नवीन खड्‌ड्यात झाड ठेवल्यावर आजुबाजुला माती भरून पायानं घट्ट दाबावी आणि झाडाला भरपूर पाणी द्यावं. झाडाचा डोलारा पाहून त्याला आणखी आधार देण्याची गरज आहे का हे तपासावं.
पप