अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तान दौर्‍यावर

    दिनांक :27-Jun-2019
इस्लामाबाद,
द्विपक्षीय संबंध सुरळीत करण्यासाठी, तसेच शांतता प्रक्रियेवरील चर्चेसाठी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी आज गुरुवारी पाकिस्तानात पोहोचले आहेत. त्यांचा हा दोन दिवसीय दौरा आहे. 

 
 
पाकिस्तानचे वित्त सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत करीत त्यांना 21 तोफांची सलामी दिली. गनी यांचा हा तिसरा पाकिस्तान दौरा आहे. अफगाणिस्तानध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या कृती योजनेचा आढावा त्यांनी यापूर्वीच्या दौर्‍यात घेतला होता.
 
त्यांच्यासोबत असलेले 57 सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ येथील बैठकीत अफगाणिस्तानमधील शांतता प्रस्थापित करण्याबाबत चर्चा करणार आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींसोबत उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ आले आहे.