भारताचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी विजयी

    दिनांक :27-Jun-2019
 
 
 
 
 
ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होत असलेल्या सामन्यात भारताने तब्बल १२५ धावांनी विजय मिळविला. भारताने वेस्ट इंडिज समोर  २६९ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त १४३ धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात विराट कोहलीने ७२ धावांची तर, धोनीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र आघाडीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. रोहित शर्मा १८ धावांवर बाद झाला. भारतीय संघाची भिस्त विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर असतानाच राहुल ४८ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याच्या खेळीच्या जोरावर भारतानं २६८ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. शमीनं दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर पांड्याने ॲम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि लनला सलग दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर शमीने आणि चहलने एक विकेट घेत विंडीजचा डाव संपुष्टात आणला. वेस्ट इंडिज विरोधात ३७ धावांची खेळी करत विराटनं २० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असं करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर (४६३ सामन्यात १८ हजार ४२६) आणि सौरव गांगुली (३०८ सामन्यात ११ हजार ३५३ धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे. याआधी विराटने १० हजार धावांचा टप्पा देखील सर्वात वेगाने गाठला होता. विराटनं हा पराक्रम करताच विजय शंकर १४ धावांवर बाद झाला. कोहलीनं आपले अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनीच्या जागी केदार जाधवला पाठवण्यात आले आहे. मात्र त्याचा काही फरक पडला नाही, केदार जाधव ७ धावांवर बाद झाला.