भारताच्या अव्वल स्थानावर आयसीसीची मोहर

    दिनांक :27-Jun-2019
मँचेस्टर,
विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध सामना सुरु झाल्यानंतर भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहचला आहे. बुधवारी ईएसपीएन क्रिकइन्फो (ESPNCricinfo) या संकेतस्थळाने भारत वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचल्याची बातमी दिली होती. आयसीसीने आज यावर आपली मोहर उमटवली आहे.

 
 
इंग्लंडचा संघ वन-डे क्रमवारीमध्ये अव्वल होता. मात्र विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामने गमावल्याचा इंग्लंडला फटका बसला आहे. या तुलनेत भारतीय संघाने आश्वासक कामगिरी करत ४ विजय मिळवले आहेत. त्यामुळे १२३ गुणांसह भारत सध्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. इंग्लंडच्या खात्यात सध्या १२२ गुण जमा आहेत.