विजेंदर सिंग अमेरिकन प्रो-बॉक्सिंग पदार्पण करणार

    दिनांक :27-Jun-2019
नवी दिल्ली,
भारताचा चमकदार बॉक्सर विजेंदर सिंग आगामी 13 जुलै रोजी न्यू जर्सीच्या न्यू वार्क येथे अमेरिकेच्या व्यावसायिक बॉक्सिंग सर्कीटमध्ये पदार्पण करणार आहे. या पदार्पणाच्या लढती विजेंदर स्थानिक दावेदार माईक स्निडरविरुद्ध झुंजेल. आपल्या व्यावसायिक बॉक्सिंग कारकीर्दीत गत 10 लढतीत विजेंदर सिंग अपराजित राहिला आहे.
  
 
वास्तविक गत एप्रिल महिन्यातच लॉस एंजेलिस येथे विजेंदर अमेरिकन व्यावसायिक बॉक्सिंग क्षेत्रात पाऊ ठेवणार होता, परंतु सराव सत्रादरम्यान विजेंदरला दुुखापत झाली आणि नंतर ही लढत रद्द करण्यात आली. दुखापतीमुळे विजेंदरला विश्रांती घ्यावी लागली व तो मायदेशी परतला. याचदरम्यान तो दक्षिण दिल्ली मतदार संघातून लोकसभा निवडणूकही लढला, परंतु जिंकू शकला नाही. स्निडरने आपली अखेरची लढत याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात खेळली, तर विजेंदर गत एकावर्षापेक्षा अधिक काळापासून लढत खेळला नाही. त्याने 2017 साली जयपूर येथे घानाच्या अर्नेस्ट अॅमुझुविरद्ध अखेरचा खेळला होता. ही लढत विजेंदरने जिंकली.