देवेंद्र फडणवीस ठरले पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री

    दिनांक :27-Jun-2019
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडविला आहे. सलग ५ वर्षे मुख्यमंत्रीपद कायम राखणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री ठरले आहेत. महत्वाचे म्हणजे १९७२ नंतर अशी कामगिरी कोणत्याच नेत्याला करता आली नव्हती. वसंतराव नाईक सलग १३ वर्षे मुख्यमंत्रीपदी होते. सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. 
 
 
 टाइम बॉण्ड पद्धतीने काम करण्याची पद्धत, स्वच्छ प्रतिमा, हजरजबाबीपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणसे  हाताळण्याची उत्तम कला यांच्या जोरावर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सक्षमपणे सांभाळले. गेल्या ५ वर्षात त्यांच्या पुढ्यात अनेक प्रश्न, आंदोलनं, समस्या आणि अडचणी उभ्या ठाकल्यात. त्या सर्वांवर त्यांनी शिताफीने मात केली.