पाकिस्तानात शिख विध्यार्थ्यांसाठी सुरु होणार पहिली शाळा

    दिनांक :27-Jun-2019
पेशावर,
पाकिस्तानातील पेशावर मध्ये शिख विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यास तेथील सरकारने मान्यता दिली आहे. या शाळेचा प्रस्ताव सरकारने अधिकृतरित्या मंजुर केला असून या शाळेची इमारत बांधण्यासाठी 22 लाख रूपयांचा निधीही मंजुर करण्यात आला आहे. त्या भागात राहणाऱ्या शिख नागरीकांनी सरकारकडे अशा स्वतंत्र शाळेची मागणी बऱ्याच वर्षांपासून सातत्याने केली होती. त्याला प्रांतिक औकाफ विभागाने मान्यता दिली आहे.
 
 
प्रांतिक सरकारने अल्पसंख्याक कल्याणासाठी नवीन आर्थिक वर्षात एकूण 5.5 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यातील 22 लाख रूपये या शाळेसाठी दिले जाणार आहेत. त्याखेरीज अल्पसंख्याकांच्या यात्रांसाठीही प्रांतिक सरकारने 86 लाखांचा निधी मंजुर केला आहे. तथापी शाळेसाठी आणखी निधीची गरज आहे असे पालकांचे म्हणणे आहे.