दोन महिला कामगारांचा टँकरच्या धडकेत मृत्यू

    दिनांक :27-Jun-2019
गोबरवाही: डोंगरी माईन्स येथील दोन महिला कामगारांचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली.
 
 
 
वंदना सेलोकर वय 39 व सुनीता पोथे वय 42 या दोघी डोंगरी बु. येथील माईन्स मध्ये कामगार होत्या. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास दोघी स्कुटीने स्वगावी बाजारटोला डोंगरी येथे जात असताना मॉईल कंपनीच्या टँकरने त्यांना धडक दिली. यात दोघीही जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तुमसरच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दोघींचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे आज वंदना हिचा वाढदिवस होता. घटनेची नोंद गोबरवाही पोलिस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरु आहे.